नळदुर्ग -: येडोळा (ता. तुळजापूर) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकशन पार्टी ऑफ इंडियाचा दोन जागेवर घवघवीत यश मिळाले असून त्यापैकी अनुसुचित जाती स्त्रीसाठी राखीव असताना त्या जागेवर रिपाइंच्या संगीता राजू लोंढे त्या बिनविरोध विजयी झाल्या. तर रिपाइंचे युवा कार्यकर्ते अमर जेटीथोर यांनी प्रस्तापिताना जबर हादरा देत खुल्या प्रवर्गातून घवघवीत विजय संपादन केले आहे.
    तुळजापूर तालुक्यातील येडोळा ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागेकरीता तीन प्रभागातून झाली असून सोमवार दि. 24 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात रिपाइंच्या संगीता राजू लोंढे व काँग्रेसचे वसंत किसन जाधव हे बिनविरोध विजयी झाले. तर उर्वरीत पाच जागेकरीता झालेल्या मतदानाच्या मोजणीत रिपाइंचे अमर जेटीथोर, काँग्रेस आय प्रणित पॅनलचे ज्योती प्रभाकर पाटील, निर्मला सुभाष राठोड, सविता सुनिल जाधव हे विजयी झाले असून विरोधी पॅनलच्या लक्ष्मी राजेंद्र जाधव हया एकमेव विजयी झाल्या आहेत. या सर्व विजयी उमेदवाराचे रिपाइं युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्प् कागदे, जिल्हाध्यक्ष राजा ओव्हाळ, सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, अरुण लोखंडे, अरुण कदम, अशोक अलकुंटे, राजेंद्र शिंदे सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
 
Top