जर तुम्ही फेसबुकचा वापर करणा-यांपैकी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुम्हाला वाय-फाय सोय अगदी फुकटात मिळणार आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाईटनेच असा प्रस्ताव पुढे आणला असुन प्रायोगिक पातळीवर याची सुरुवात झाली आहे. छोट्या उद्योगाच्या ठिकाणी ही सेवा देण्याचा विचार असून युझर्संना केवळ फेसबुकच्या वापरासाठी वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. एखाद्या कॉफी शॉपमध्ये किंवा अन्य ठिकाणी तुम्ही वाय-फायद्वारे फेसबुकचा वापर करु शकता. यासाठी रुट लिंक फेसबुकद्वारेच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. युझरला फेसबुकचा वापर करायचा असेल तर संबंधित कॉफी शॉपच्या फेसबुक पेजद्वारे तुम्ही फेसबुकवर दाखल होवू शकता. याद्वारे संबंधित उद्योजकांच्या पेजला लाइक्स मिळण्याची शक्यता असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.