उस्मानाबाद :- शेतकऱ्यांना पीक कर्ज परतफेडीसाठी राज्य शासनाने 15  ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. पी. बडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी मागील हंगामात बॅंकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची  या मुदतीत परतफेड करावी, यामुळे संबंधित शेतकरी डॅा. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरतील, असे कळविण्यात आले आहे.
        शासनाने दिलेल्या सवलतीनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत परतफेड करावी. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने नवीन कर्ज पुरवठा करण्यात येईल, असे बॅंकांनीही मान्य केले आहे.
      अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद अथवा संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बडे यांनी केले आहे.                          
 
Top