उस्मानाबाद :- अन्न सुरक्षा कायदा 2006 व त्या खालील नियमांतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायीकांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना न घेता अन्न व्यवसाय चालू ठेवल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करुन  रुपये 5 लाख दंडाची तरतुद अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत करण्यात आली आहे. तरी संबंधित व्यावसायीकांनी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक  परवाना घेवून आपला व्यावसाय सुरु ठेवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त  अ. घी. पारधी  यांनी केले आहे.
         उत्पादन अन्न प्रक्रिया केंद्र विभागणी दर्जानुसार दुध संकलन/ शितकरण केद्र, दुध पॅकेजिंग व प्रक्रिया केंद्र, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, पुनर्वेष्टन, सॉल्वंट एक्सटॅकटींग ॲन्ड ऑईल रिफायनिंग प्लान्ट,  तेल घाणे, आटा मैदा, रव्याचे उत्पादक, साखर कारखाने, गुळ उत्पादक, गुऱ्हाळ, डिस्टीलरीज, वाईनरीज, बियर उत्पादक, विदेशी  दारु उत्पादक, पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर / मिनीरल वॉटर उत्पादक, शीतपेय उत्पादक, मसाला पदार्थांचे उत्पादक, फुड ॲडिटीव्हचे उत्पादक, खादयरंग उत्पादक, पुरक अन्न पदार्थ उत्पादक, न्युटासिटीकल फुड उत्पादक, चहा, कॉफी उत्पादक, पॅकर कन्फेक्शनरी उत्पादक, आईसक्रीम उत्पादक, आईस कॅन्डी उत्पादक, बेकरी बेक फुड उत्पादन, सुकडी उत्पादक, कत्तलखाने, खारेशेंगदाणे व चणे फुटाणे, फेणी, शेवया, चकली उत्पादक, चिवडा आदी  घरगुती उत्पादक, कॅन्डी स्लॉस,  बुढढीके बाल उत्पादक, चहा कॉफीचे उत्पादक,पॅकर तारांकित हॉटेल, रेस्टारंट, हॉटेल, कॅटरींग ढाबा किंवा तत्सम आस्थापना, क्लब, कॅन्टीन, खाजगी कंपन्यातील कॅन्टीन, खाजगी वसतीगृहातील कॅन्टीन, शाळांमध्ये जेवण पुरविणारी महिला मंडळे/ बचतगट/ शासकीय कॅन्टीन निमशासकीय कॅन्टीन, एस. टी. कॅन्टीन, सरकारी गोदाम, निमसरकारी गोदाम, अंगणवाड्या, शासकीय आश्रमशाळा, समाज कल्याण खात्यांतर्गत वसतीगृहे, खाजगी केंद्र, शितगृहे, किरकोळ दुध वितरक दुग्धजन्य पदार्थाचे वितरक, साठवणूक/ गोदाम अन्न धान्याचे वितरक, मसाल्याच्या पदार्थांचे वितरक, कन्फेक्शनरी वितरक, खाद्यतेल, वनस्पती, तुपवितरक, पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर/ मिनरल वॉटर वितरक शीतपेय वितरक, भाजीपाला घाऊक विक्रेते, फळे घाऊक विक्रेते, अन्नपदार्थांचे घाऊक विक्रेते, अन्नपदार्थ्याचे किरकोळ विक्रेते, शिधावाटप केंद्र, रेशन शॉपफुड ॲडिटीव्ह विक्रेते, भाजीपाला किरकोळ विक्रेते, फळे किरकोळ विक्रेते किरकोळ विक्रेते, चिकन शॉप मटन, शाप मासे विक्रेते, कुल्फी विक्रेते, बर्फगोळा /आर्ईस कॅन्डी  विक्रेते आईसक्रीम विक्रेते. ज्युस सेटर ,उस रस विक्रेते, चहा कॉफी स्टॉल ,चव्हाण कॉफी व इतर अन्न पदार्थ्याचे विक्रेते, स्नॅक बार खानावळ, वडापाव उत्पादन व विक्री पोळीभाजी केंद्र, इडलीवडा स्टॉल, चायनिज अन्न पदार्थ्यांचे स्टॉल/ इडलीडोसा तयार पिठ विक्रेते, फेणी, शेवया, चकली, चिवडा इ. विक्रेते भेळपुरी विक्रेते, पाणीपुरी विक्रेते, अंडी/ पाव/ ब्रेड/ बिस्कीट विक्रेते, पानशॉप, जत्रा, मेळावे, प्रदर्शन, इ.तात्पुरत्या काळातीलअन्न पदार्थ विक्रेते जत्रा आठवडीबाजारातील अन्नपदार्थांचे विक्रेते, आयातदार, निर्यातदार अन्न पदार्थ वाहतूकदार अशा सर्वांना हे परवाने घेणे बंधनकारक आह, असे कळविण्यात आले आहे.
 
Top