मुंबई : राज्यात सर्वसाधारणपणे चांगला पाऊस झाला असला तरी राज्यातील 20 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जत, उमरगा, परांडे, मंगळवेढा, कळंब, पलुस, शिरोळा, हातकणंगले, नेवासा, तासगांव आदी तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. टंचाईग्रस्त भागात 2847 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 700 छावण्यांमध्ये 5 लाख 45 हजार जनावरे आहेत. टंचाईग्रस्त भागांमध्ये ज्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत, त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी यामध्ये निर्णय घ्यावयाचा आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन उपस्थित होते.
उत्तराखंड राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्यातून ज्या अधिकाऱ्यांना तेथे पाठविले, त्यांचा आज डॉ.कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव ए.राजीव., उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मनोज रानडे, जयकृष्ण फड, एम.एस. आर.डी.सी.चे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.रामचंदानी, डॉ.सौरभ गांधी, डॉ.निलेश, डॉ.महेंद्र बावेकर, नायब तहसिलदार विशाल दौडकर, मोटार वाहनचालक दिपक उगले, विजय शेळकर, प्रशांत कापडे यांचा समावेश आहे.
उत्तराखंड येथील राज्यातून गेलेल्या 3,014 भाविकांपैकी 2,852 भाविक सुखरुपपणे राज्यात पोहोचले असून 158 व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील 71, नागपूर विभागातील 44, पुणे विभागातील 28, नाशिक विभागातील 4, कोकण विभागातील 7, अमरावती विभागातील 4 व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींची नांवे आणि इतर माहिती उत्तराखंड शासनाकडे प्राथमिक अहवालाद्वारे पाठविण्यात आली आहे. 4 व्यक्ती मृत झाल्याचे उत्तराखंड शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या सचिव तथा संचालक श्रीमती आय.ए.कुंदन यांनी यावेळी दिली.