नवी दिल्ली :- ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणा-या “इंडियन लिडरशीप अवार्ड फार एज्युकेशन एक्सलन्स” या राष्ट्रिय पुरस्काराने पुण्यातील यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.
     नवी दिल्ली येथे नुकत्याच दि. 6 जुलै रोजी झालेल्या ‘राष्ट्रिय विकास आणि अतुलनीय योगदान या विषयावरील राष्ट्रिय परिसंवादाच्या प्रसंगी हा पुरस्कार समारंभ संपन्न झाला.
     केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त जी.व्ही.जी. कॄष्णमूती, माजी केंद्रिय मंत्री डॉ. भीष्मनारायण सिंग, निवॄत्त मुख्य न्यायाधीश ओ.पी. शर्मा  आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मेजर वेद प्रकाश आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळस झाला. उद्योग, व्यापार जगत, आरोग्य, पत्रकारिता आणि शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ति किंवा संस्था यांना हा पुरस्कार  देण्यात येतो.
      यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमतून ‘शिका व कमवा’या योजनेद्वारे आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण मोफत देण्याचा अभिनव उपक्रम विश्वेश कुलकर्णी आपल्या संस्थेमार्फत राबवित आहेत. 2010 साली उद्घाटन झालेल्या ‘शिका व कमवा’या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त योजनेत सध्या राज्यातील 7200 विद्यार्थी 130 नामाकिंत कंपन्यांमधून ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ पध्दतीने मॅकेनिकल इंजिनिअरींगचे  शिक्षण घेत आहेत. आपल्या या अभिनव संकल्पनेव्दारे उद्योग जगत आणि शिक्षण क्षेत्र यांचा योग्य समन्वय साधून विश्वेश कुलकर्णी यांनी एक पथदर्शी आणि अनुकरणीय प्रकल्प देशासमोर मांडला आहे त्यांचे हे योगदान देशाच्या राष्ट्रीय विकासाला पोषक आहे म्हणूनच त्यांना ‘इंडियन लिडरशीप अवार्ड फॉर एज्युकेशन एक्सलन्स’ या राष्ट्रिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे ऑल इंडिया अचिव्हर्स फाउंडेशनच्यावतीने  सांगण्यात आले.
     यावेळी कार्यक्रमाला उद्योग, व्यापार विश्व, अर्थतज्ज्ञ तसेच शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
Top