उस्मानाबाद :- श्रीगजानन महाराजांच्या पालखीचे आज उस्मानाबाद येथे आगमन झाले. पालखी मार्गावर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांच्यासह मोठया संख्येने अधिकारी, कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.
यावेळी पालखी सोहळा समितीच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

पालखी मार्गावर उस्मानाबादच्या कलापथकाचा स्वच्छतेचा जागर
उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने आषाढीवारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात स्वच्छता दिंडी पाठविण्यात आली. यात सहभागी झालेल्या ईश्वर प्रभु कलापथकाने स्वच्छतेचा जागर घालून वारकऱ्यांना मंत्रमुगध केले.
भारत निर्माण अभियानाच्या माध्यमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर पालखी सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी प्रबोधन करण्यासाठी 18 जिल्हा परिषदेचे कलापथक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 कलाकारांचा संच व कक्षातील संवादतज्ञ हनुमंत गादगे व श्रीहरी चव्हाण यांना पाठविण्यात आले आहे.
भारुड, पोतराज, लावणी, बतावणी व वासूदेव या माध्यमातून जनतेला स्वच्छतेचे महत्व तसेच पर्यावरण, गाव विकासासाठी ग्रामसभा बळकटीकरण या विषयावर हे कलाकार जगदगुरु तुकोबांच्या पालखी मुककाम व दुपारी विसावा ठिकाणी प्रबोधनाचा जागर करीत आहेत.
या कलाकारांनी लोणी, काळभोर, उरुळी कांचन, वरवंड, उंडवडे बारामती गावी वारकऱ्यांना स्वच्छता संदेश, शौचालय बांधकाम व वापर, लहान मुलांच्या विष्टेची योग्य विल्हेवाट व पिण्याच्या पाण्याची योग्य हाताळणी या विषयावर जनजागरण केले व पंढरपूरपर्यंत हे पथक या स्वच्छता दिंडीत असणार आहेत.