बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ज्या गुरुंनी विदयार्थ्यांना शिक्षण दिले, त्याच विदयार्थ्यांपासून परीक्षेच्या वेळी गुरुंना संरक्षण घ्यावे लागते, ही खेदाची बाब आहे. त्याकरीता स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणापर्यंत पोहोचवणे ही गरज आहे. विवेकानंदांच्या विचराचे आचरण केल्यास समाज परिवर्तन होईल, असे मत डॉ. बी.वाय. यादव यांनी व्यक्त केले.
    स्वामी विवेकानंद यांची सार्धशती रथयात्रा समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. यादव बोलत होते. यावेळी विजयश्री पाटील, धिरज शेळके, संतोष खुडे आदीजण उपस्थित होते.
    रामकृष्ण मठ, पुणे येथून निघालेली चित्ररथ, पथनाटय, नृत्य, गाणी, लेझीम, समाजपरिवर्तन देखावे, अशी शोभायात्रा दि. 3 सप्टेंबर रोजी बार्शीत येत असून शहरातील सर्व शाळा, महाविदयालये, सांस्कृतिक, क्रीडा मंडळे, सेवाभावी संघटना यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले.
 
Top