उस्मानाबाद :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबादतर्फे जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या पारधी समाजातील 96 पात्र लाभार्थ्यांची निवड घरकुल योजनेसाठी झाली आहे. घरकुल मंजूर करण्याविषयीची बैठक नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या बैठकीत ईश्वर चिट्टीव्दारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
समितीने तालुकानिहाय निवड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. उस्मानाबाद तालुक्यातून 36, तुळजापूर 5, कळंब-32, भूम-11, वाशी-10 व परंडा 2. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी. यु भांगे, औरंगाबादचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जे. एस. साने, सोलापूर प्रकल्प अधिकारी एस.डी. गोलाईत, गृहपाल यु. ए. कोटुरवार, यांच्यासह लाभार्थी पुरुष- महिला मोठया संख्येने उपस्थित होते.