बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वैराग, बार्शी, उस्मानाबाद, लातूर आदी विविध ठिकाणी फसवणूक करुन सहीसलामत निसटून जाणा-या अटल 420 ला वैराग पोलिसांनी अटक करुन बार्शी पोलिसांकडे वर्ग केले आहे. सदरच्या फसवणूक करणाराचे नाव अमित रामा झेंडे (रा. गोरोबा काका नगर, सांजा रोड, उस्मानाबाद) असे असून त्याने स्वत: तलाठी व ट्रेझरी अधिकारी असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक केली आहे. त्याने फसवणूक करुन मिळविलेले पैसे चैनीसाठी, तमाशाच्या नादात व स्वखर्चासाठी खर्च केल्याची कबुली दिली आहे. याबबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडवळ या करीत आहेत.
 
Top