बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: ग्रामीण भागात शिक्षण घेवूनही चांगल्या दर्जाचे ज्ञानग्रहण करुन विदयार्थ्यांना चमकदार कामगिरी येते. गुणवत्ता ही श्रीमंतांची मक्तेदारी नाही. त्यांना शिक्षण देणा-या शिक्षकांनी जातीने लक्ष घालून विदयार्थी घडविण्याचे काम करावे, अशा विदयार्थ्यांच्या सुख सोयीकरीता गरजेच्या वस्तूंची उपलब्धता करुन देण्यास आपली सामाजिक संस्था मदत करेल, असे मत आर.एस.एम. समाजसेवी संस्थेचे संस्थापक राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हा व बार्शी तालुक्यातील विविध नगरपालिका, ग्रामपंचायत व जिल्हापरिषदांच्या शाळेतील विदयार्थ्यांना देण्यात येणा-या 2 लाख वहयांच्या वितरण समारंभाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. या कामाची सुरुवात बार्शीतील नगरपालिका गाळा क्रं. 8, 6 व 14 येथून करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते प्रत्येक विदयार्थ्यांना तीन वहयाचे वितरण करण्यात आले.
या कायर्क्रमास बार्शी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पवार, माजी पोलीस निरीक्षक नाना कदम, सुहास मोहिते, अविनाश पोकळे, दत्तात्रय जाधव, शिरीष घळके, नगरपालिका शाळेतील शिक्षक सुरेश जाधवर, डी.आर. सोनटक्के, सांगाडे, सालगुडे, हजारे, नगरसेवक पाचू उघडके, संातेष सावळे, संतोष गलांडे, नगरसेविका सौ. मेनकुदळे आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना मिरगणे म्हणाले, घोलपसारख्या विदयार्थ्यांच्या गुणाकडे पाहून आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यानेदेखील अशा शाळेत शिक्षण घेऊन आज जिल्हाधिकारी पदापर्यंत बार्शीचे नाव केले आहे. आपण स्वत:ही अशा शाळेचे विदयार्थी असल्याचे आवर्जुन सांगत अशा शाळेतील विदयार्थी बहुतांश गुणवत्ताधारक असतात. त्यांना अभ्यासात गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी त्यांच्या पालकांनाही आपला मुलगा हुशार आहे, असा आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. ही मुले चिखलाचा गोळा असून शिक्षक हे मुर्तीकार आहेत. त्यांनी आकार देईल तशा गुणवत्तेचे विदयार्थी घडतील त्याकरीता त्यांच्या विकासासाठी येणा-या अडचणी दूर करण्याचा आर.एस.एम. ग्रुपच्यावतीने प्रयत्न केले जाईल. पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे आणि जगवणे हे देखील विदयार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.