मुंबई : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झाले, त्या बिहारमधील बोधगया येथील पवित्र महाबोधी विहारात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे.
बोधगया येथील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या संवेदनशील स्थळांच्या सुरक्षेचा आढावा मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी आज घेतला. या सर्व स्थळांवरील सुरक्षा वाढविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
शांततेचा दिपस्तंभ असलेल्या गौतम बुद्ध मंदिरात आलेल्या निष्पाप भाविक आणि भिक्षुकांवर हल्ला करणे हा निव्वळ भ्याडपणा आहे. सर्वच धार्मिक स्थळांचा आदर करावा, ही आपली शिकवण असून अशा प्रकारच्या हल्ल्या ने आम्ही डगमगणार नाही, असे सांगून जनतेनेही संयम पाळावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.