उस्मानाबाद - जिल्ह्यातील आजी व माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना सूचित करण्यात येते की, हयात नसलेल्या सैनिकांचे व सेवारत असलेल्या सैनिकाच्या कुटुंबियांना नित्याच्या अडचणी सोडविण्यासाठी मदतीची गरज भासते. त्यांना त्वरीत मदत मिळावी, याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील होमकर, एस. डी., कल्याण संघटक याची सैनिक कुटुंब संपर्क अधिकारी म्हणून निवड केली आहे. ते तुळजापूर उमरगा व लोहारा तालुक्याचे कामकाज पाहतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9850570611, असा आहे.
         तसेच आर. एन. साळुंखे कल्याण संघटकाची कुटुंब संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती माहे जुलै 13 ते डिसेंबर 2013 पर्यंत आहे. त्यांचा संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक  7588820117 आहे. ते कळंब, भूम, परंडा व वाशी तालुक्याचे कामकाज पाहतील.अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, उस्मानाबाद येथे  संपर्क साधावा.
     गरजु आजी व माजी सैनिकांच्या अवलंबितांनी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित तालुक्याच्या सैनिक कुटुंब संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडी- अडचणी निवारण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सुभाष सासने, (मेजर नि), उस्मानाबाद यांनी केले आहे.                                        

माजी सैनिकांना आवाहन
उस्मानाबाद - भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई या क्षेत्रीय कार्यालयातर्फे  माजी सैनिकांची सुरक्षा रक्षाची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी विहीत नमुन्यात फॉर्म दि. 12 जुलैपर्यंत भरुन पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबादशी संपर्क साधावा,असे आवाहन मेजर( नि.) सुभाष सासने यांनी केले आहे.
                                                    
माजी सैनिकांची वेस्टर्न रेल्वेत भरती
उस्मानाबाद,दि.5- वेस्टर्न रेल्वे विभागातर्फे माजी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक माजी  सैनिकांनी विहीत नमुन्यात फॉर्म दि. 10 जुलैपर्यंत भरुन पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबादशी संपर्क साधावा,असे मेजर( नि.) सुभाष सासने यांनी कळविले आहे.                                        
 
Top