उस्मानाबाद :- ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद उस्मानाबादमार्फत राबविण्यात येत असलेल्या उमरगा व लोहारा तालुक्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेची बैठक पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, अप्पासाहेब पाटील, पंचायत समिती उमरगाचे सभापती अक्षरताई सोनवणे, कार्यकारी अभियंता आर. एस. तांगडे आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले की, या पेयजल योजनेत जी गावे हागणदारीमुक्त आहेत त्या गावांना प्राधान्य देण्यात येत असून, जी गावे निवडली आहेत अशा उमरगा तालुक्यातील नवीन 31 व जुने 24 आणि लोहारा तालुक्यातील नवीन 18 व जुने 13 ही गावे व तांड्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामास गती दयावी, असेही ते म्हणाले.
प्रत्येक गावाने 10 टक्के लोकवाटा भरुन सदर योजनेचा आपल्या गावाला फायदा करुन घेणे गरजेचे आहे. साधारणता 3 ते 4 वर्षानी या नैसर्गिक संकटाला तेांड दयावे लागते. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. तेंव्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन माहिती संकलीत करुन पेयजल योजनेचा जनतेला फायदा करुन देण्यासाठी लक्ष दयावे. तसेच गाव हांगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील माता-भगिनींने पुढाकार घेवून आपले गाव हागणदारीमुक्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रत्येक गावच्या सरपंचाने पुढाकार घेवून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ जनतेला कसा देता येईल, या कामावर भर देवून आपले गाव आदर्श करावे, असे प्रतिपादन डॉ. व्हट्टे यांनी केले.
याप्रसंगी लोहारा पंचायत समितीचे सभापती अशीफ मुल्ला,जि.प. सदस्य दिलीप भालेराव, दिपक जवळगे,अल्का भोसले, उमरगा गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे, लेाहारा गटविकास अधिकारी मनोज जाधव, उपअभियंता डी. डी. मुळे, शाखा अभियंता बी. एस. करमोडी तसेच विविध गावचे सरपंच,ग्रामसेवक आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागोराव पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जि.प.सदस्य दिलीप भालेराव यांनी केले.