उमरगा -: ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी उमरगा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना एक हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवार दि, 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
दगडू सीताराम काळे (उमरगा तहसिल) असे लाच स्विकारणा-या नायब तहसिलदाराचे नाव आहे. तुगांव (ता. उमरगा) येथील रमेश आनंदा राठोड यांना त्यांचे खाजगी कामासाठी 75 हजार रूपयाचे ऐपत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी दि. 12 जुलै रोजी तहसील कार्यालय उमरगा येथील सेतू सुविधा केंद्रात रितसर विहित नमुन्यात अर्ज भरून ऐपत प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज त्यासोबतची आवश्यक ती कागदपत्रे सादर केली होती. दोन लाखापर्यंची ऐपत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नायब तहसीलदाराना आहेत.
रमेश राठोड यांनी ऐपत प्रमाणपत्र मिळण्यासाठी नायब तहसीलदार काळे यांना त्याच दिवशी साडेपाच वाजता विंनती केली. मात्र त्यांनी ऐपत प्रमाणपत्र दिले नाही. व एक हजाराची मागणी करून सदरची रक्कम सोमवारी त्यांच्या कार्यालयात आणून देवून ऐपत प्रमाणपत्र घेवून जाण्यास सांगितले. यांनतर रमेश आंनदा राठोड यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक भागास नायब तहसीलदार काळेंच्या विरोधात सविस्तर तक्रार नोंदविली त्यानुसार सोमवारी लाचलुचपत विभागाने उमरगा तहसील कार्यालयात सापळा रचला व तक्रारदार रमेश राठोड यांच्याकडून लाच स्विकारताना नायब तहसीदार काळे यांना रंगेहात पकडून उमरगा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदयाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. या कार्यवाहीवेळी पोलिस उपअधिक्षक नईम हाश्मी, त्यांचे सहकारी पोलिस निरिक्षक अश्विनी भोसले, विश्वनाथ सिद, सपोफौ चंद्रकांत देशमुख, पोनॉ. अश्विनकुमार जाधव, सुधीर डोरले, पोकॉ. नितीन सुरवसे, चापोना राजाराम चिखलीकर यांच्या पथकानी ही कारवाई पार पाडली.