उस्मानाबाद :- अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकडून सन 2013-14 या वर्षात परदेशात उच्च शिक्षणासाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. विहीत नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसह 17 जुलैपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा.संबंधितांनी त्यांचा अर्ज आयुक्त, समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य, 3,चर्चरोड, पुणे-1 यांच्याकडे सादर करावा.