उस्मानाबाद :- उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा या उदृदेशाने यावर्षी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक- एक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता-एक व गुणवंत खेळाडु दोन त्यापैकी एक महिला व एक पुरुष खेळाडुंना  शासनातर्फे क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे.
             पुरस्कारसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात कार्य केलेला असावा, क्रीडा कार्यकर्त्यांनी सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले पाहिजे. खेहाडूने दोन वर्ष तया जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले पाहिजे.
            क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रृीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानातील राष्ट्रीय स्तरापयंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र  राहतील.
           नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिक्ंयपद स्पर्धेत प्रिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारो किमान तीन खेळाडु घडविणारा मार्गदर्शक विहीत नमुन्यात अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिकरित्या  मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
           गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारसाकरीता क्रीडा कार्यकर्ते/ संघटक यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन तीन प्रकारे करण्यात येईल. विकासात्मक कार्य, संघटनातमक कार्य वक्रीडा प्रचार व प्रसार सदरील सर्व कामाबाबत संबंधित जिल्हा व राज्य संघटनेची प्रमाणपत्रे जोडावीत. क्रीडा कार्याचा किमान दहा वर्षाचा अनुभव व त्याचे वय किमान 30 वर्षे पूर्ण केलेले असावे. पुरक अंग म्हणून स्पर्धेतील कामगिरीसुध्दा विचारात घेतल्या जातील.
          तरी संबंधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यात आपले अर्ज 14 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे संजीव कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.
 
Top