उस्मानाबाद :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबादमार्फत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गटसमन्वयक ही पदे करार पध्दतीने भरावयाची असून या पदासाठी प्राप्त अर्जानुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूचना फलकावर तसेच www.Osmanabad.nic.in वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
         यादीबाबत उमेदवारांची कांही आक्षेप असल्यास त्यांनी 18 जुलै पर्यंत लेखीस्वरुपात पाठविण्यात यावे. आक्षेप असल्यास त्यांनी  मुळ अभिलेख्यासह उपस्थित राहून आक्षेपाची पूर्तता करावी. याउपरही आक्षेप प्राप्त न झाल्यास प्रसिध्द करण्यात आलेली यादी पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल, याची संबधितानी नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top