बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्रात वीज वितरण कंपनी ही शेक-यांनी वीज चोरी केल्याचा खोटा बेबनाव करत आहे. वीज निर्मिती उदयोगासाठी लागणा-या कोळशाच्या खरेदीमध्ये मोठयाप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. उर्जा खात्यामध्ये 20 हजार कोटींचा घोटाळा आहे, त्या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे आपणाकडे असून या अधिवेशनात सादर केले जातील. घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:हून राजीनामा दयावा, सदरचे आरोप खोटे सिध्द झाल्यास मी राजीनामा देतो, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठठलाचे दर्शन घेऊन बार्शीमार्गे बीडकडे मार्गस्थ होताना बार्शीतील आर.एस.एम. उदयोग समूहाचे अध्यक्ष राजेंद्र मिरणे यांच्या निवासस्थानी विश्रांती घेतल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी एकनाथ खडसे व त्यांच्या धर्मपत्नी मंदाताई खडसे यांना सत्कार आरएसएमचे संस्थापक राजेंद्र मिरगणे यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी सरपंच बाजीराव तांबे, नवनाथ मिरगणे, बिभिषण पाटील, दत्तात्रय जाधव, दिलीप खटोड, शिरीष घळके, मदन गव्हाणे, पिनू शिंदे, संदिप राऊत, पंडित मिरगणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, महापारेषण कंपनीकडून वीज निर्मिती करताना आजर्पंत कधीही पूर्ण क्षमतेने वीजेचे उत्पादन केले जात नाही. कोळसा उपलब्ध नाही, पुरेसा पाऊस नसल्याने पाणी उपलब्ध नसल्याची कारणे दिली जातात. चांगल्या दर्जाचा कोळसा परदेशातून कोळसा आवात करावा लागेल, असे भासवून प्रत्यक्षात स्थानिक छोटया कंपन्याकडील कोळसा घेऊन त्यामध्ये टक्केवारी ठरविली. सदरचा कोळसा देखील तेवढया ज्वलनशक्तीचा नसल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांची बसविण्यात आलेली मीटर्स वारंवार बिघडत असल्याचे दाखवून मोठया प्रमाणात खरेदी केली आहे. सदरच्या मीटरमध्येही मोठया प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मीटरची गॅरंटी असणे आवश्यक आहे. शेतक-यांना शासनाच्या वतीने 33 टक्के सुट देण्यात आलेली असताना पुन्हा त्यांच्याकडून त्याच्या बीलांची आकारणी केली गेली, ही दुष्काळग्रस्त शेतक-यांची फसवणूकच आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार राजेंद्र मिरगणे यांच्यासोबत विठठलाचे दर्शन घेऊन एकनाथराव खडसे त्यांच्यासोबत बार्शीला आले असल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे. पंढरपूरला विठठलाच्या दश्रनासाठी येणा-या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने त्यांचे वाहन चार तास रस्त्यातून काढत न आल्याने त्यांना वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागला.
यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मनसेचा समावेश असे की नाही, याबाबत विचारणा केली असता शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीय या मित्रपक्षांचीच महायुती असून मनसेसाबत सध्या तरी काही सांगू शकत नसल्याचे म्हटले.