नांदेड -: गुरुपौर्णिमा महोत्सव दि. 22 जुलै रोजी असून या दिवशी श्री बालाजी मंदीर गाडीपूरा येथे गुरुदिक्षा व गुरुपूजासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या धार्मिक विधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत स्वामी सच्चिदानंद शास्त्री यांनी केले.
    श्री बालाजी मंदीर गाडीपूरा येथे पवित्र गुरुपोर्णिमेपर्यंत गुरु भक्ती करत गुरुंच्या चरणाची पूजा वंदना, अर्चना हे कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमास सहभागी होवून श्री बालाजी भगवान व समस्त गुरुजनांचा अनुग्रह प्राप्त करावा, सकाळी नऊ वाजता पुज्य स्वामींजी द्वारा श्रध्दालू भक्तांना शंकचक्र धारन करुन गुरुदिक्षा देण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता गुरुजनांची पुजा, वंदना व अर्चना होऊन पंचामृत प्रसादाचे वाटप होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे विश्वस्त मंडल श्रीयर स्वामी संस्थान श्री बालाजी मंदीर गाडीपूराचे मंहत स्वामी सच्चिदानंद शास्त्री यांनी आवाहन केले आहे.
 
Top