नळदुर्ग -: येथील बौध्दनगर मधील शासकीय गावठाण जागेवर सन 1990 सालापूर्वीपासून राहणा-या बंजारा व दलित समाजाच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार प्रत्येकी कुटुंबास एक गुंठा जागा नावावर करुन लाभार्थ्यांना त्याचा कबाला दयावे, त्या दृष्टीने सर्वेक्षण करुन महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आदेश महसुल खाते व नगरपालिकेस राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे दिले.
     नळदुर्ग येथील बौध्दनगरमधील नागरिकांच्या अडीअडचणीबाबत जि.प. कन्या प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बौध्दनगरवासीयांशी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी अडीअडचणी जाणून घेतली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शब्बीर सावकार तर प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पाटील, तहसिलदार व्ही.एल. कोळी, उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, ‍जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, तालुका रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष महादेवप्पा आलुरे, माजी उपनगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक शहबाज काझी आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्दनगरवासियांच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा मारुती बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र साखरे, श्रीमती अनिता रणे यांनी सत्कार केले. यावेळी ना. चव्हाण बोलताना पुढे म्हणाले की, शासकीय जागेवर राहणा-या बंजारा, दलित व इतर समाजाच्या कुटुंबियास लवकरच त्यांच्या नावे कबाले करुन देण्यात येणार असून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगून तुळजापूर तालुक्यात जवळपास तीन हजार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुले दिले आहेत. त्याचबरोबर नळदुर्ग येथे 251 घरकुले दिली आहेत. मात्र दलित व बंजारा समाजाच्या राहणा-या लोकांच्या नावे जागा नसल्याने त्यांना लाभ मिळाला नाही. ज्या नागरिकांकडे एक गुंठयापेक्षा अधिक जागेवर अतिक्रमण केले असेल त्यांनी आपले अतिक्रमण स्व्‍त:हून काढून सहकार्य करावे. त्याकरीता नगरपालिकेने तात्काळ सर्वेक्षणाचे काम हाती घेवून लाभार्थी कुटुंबियांच्या जागेची प्रत्येकी एक गुंठा यानुसार मोजणी करुन प्रस्ताव पाठविण्याचे सूचना दिली. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून शेळी, कोंबडी पालन सह इतर व्यवसायासाठी शासन स्तरावरुन आवश्य्क ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी देवून शासनाच्या विविध योजनाचे लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढे येण्याचे आवाहन ना. चव्हाण यांनी शेवटी केले.
      यावेळी बौध्दनगर सर्व्हे नं. 29 मधील शासकीय गावठाण जागेवर राहणा-या बंजारा व दलित  कुटुंबियांच्या नावे जागा करुन कबाले देण्याच्या मागणीचे निवेदन बौध्दनगरच्यावतीने पालकमंत्री ना. चव्हाण यांना सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे, पत्रकार शिवाजी नाईक यांनी दिले.
       या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, नगरसेविका सौ. लक्ष्मी खारवे, सुप्रिया पुराणिक, मंगल सुरवसे, कुशावर्ती शिरगुरे, मुनवर सुलताना कुरेशी, तुळजापूर तालुका दक्षता समितीच्या सदस्या शाहेदाबी सययद, शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विनायक अहंकारी, शहराध्यक्ष प्रा. जावेद काझी, अख्त्र काझी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, बाबुभाई कुरेशी, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, मारुती खारवे, कमलाकर डुकरे यांच्यासह बौध्दनगरमधील दलित व बंजारा समाजाचे महिला व पुरुष मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन दादासाहेब बनसोडे यांनी तर आभार शाहेदाबी सययद यांनी मानले.
फोटो ओळ –: नळदुर्गच्या बौध्दनगर येथील सर्व्हे नं. 29 मध्ये शासकीय गावठाण जागेवर राहणा-या कुटुंबियाना त्यांच्या नावे जागा करुन कबाला देण्याच्या मागणीचे निवेदन बौध्दनगरवासियांच्यावतीने पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांना देताना सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे, पत्रकार शिवाजी नाईक. शेजारी
 
Top