बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्यावर अनेकांनी उशीरा मिळाल्याचे बोलून दाखवले त्यावर कधीच न मिळण्यापेक्षा उशीरा मिळालेले बरे, आपण शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे तसेच जनतेची बांधीलकी जपून केलेल्या चांगल्या कर्माचेच फळ मिळाले असल्याचे ना. दिलीप सोपल यांनी म्हटले.
कांदलगांव ता. बार्शी येथील आयोजीत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी केलेल्या जाहीर प्रवेशावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करुन आपण अपक्ष असल्याची जाणीव करुन दिली. जाहीर प्रवेशातील उपसरपंच मुकटे ताई, बाळासाहेब मुकटे, साकतचे सरपंच बाळासाहेब पोतदार, रविंद्र धर्मा मुकटे, रामदास आबा मुकटे, विठ्ठल मुकटे, प्रकाश मुकटे, दिनकर फुरडे, गौतक मुकटे, सज्जन मुलाणी, सिरसावचे सरपंच रामदास मुकटे, देवगाचे योगेश मांजरे, गौडगावचे अमृत पाटील, नागोबाची वाडी येथील ग्रा.पं. सदस्य आमनाथ पवार, शिवसेनेचे अँड्. धस, तसेच आयत्या वेळी नितीन नवले यांनी व्यासपीठावर राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, आर्यन शुगर्सचे कार्यकारी संचालक विलास आप्पा रेणके, नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, रामेश्वर मांजरे, विकास जाधव, गणेश जाधव, नगरसेवक मुन्ना शेटे, अंबादास शिंदे, बाबूराव जाधव, अमोल गुडे, सुधीर काळे, शमशोद्दीन केमकर, रमेश पाटील, बाळराजे पाटील, मंदा काळे, नगरसेविका मंगल शेळवणे, सौ. पठाण, रिझवाना शेख, सौ. पाटील, सौ. मनकुदळे, रंगातात्या धस, अविनाश गायकवाड, शंकर मांजरे, अब्बासभाई शेख यांसह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.सोपल म्हणाले, अनेकांच्या आडनावातही गंमत असते असे सांगतांना राऊत यांच्या आडनावातील शेवटची दोन अक्षरे ऊत अशी आहेत, आंधळकर यांच्या आडनावातील पहिली तीन अक्षरे आंधळ अशी आहेत तर आपल्या सोपल या आडनावातील पहिली दोन अक्षरे सोप अशी आहेत त्यामुळे आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करतांना सोप्या पध्दतीने करुन न्याय देण्याचेच काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. या अगोदर दोन वेळा राज्यमंत्रीपद मिळाले, चाळीस अपक्षांचे आपणास चांगले सहकार्य लाभले. त्यामुळेच कृष्णा खोरे सारख्या प्रकल्पाची सुरुवात करता आली, अनेक न होणार्या कामांना अतिशच सोप्या पध्दतीने हाताळून झटपट कामे करण्याची आपली पध्दत आहे. बार्शी तालुक्यासाठी विविध रस्ते, बंधारे, विविध योजना, उपसा सिंचन, पिण्याच्या पाण्याची उजनी योजना, उपसा सिंचनसाठी बोगद्याची कल्पना, विकास कामांसाठी विविध खात्यांचे निधी उपलब्ध करुन अनेक समाजोपयोगी कामे केली व यापुढे जनतेच्या विश्वासावर आणखी कामे पूर्ण करणार आहे. याउलट विरोधकांनी सत्ता मिळाल्यावर विधानसभेत पाच वर्षांत एकदाही तोंड उघडले नाही. स्वत:च्या उद्योगात लक्ष दिले, १९८५ च्या निवडणुकीवेळी त्यावेळच्या ज्येष्ठांनी केलेल्या विनंतीवरुन तसेच पक्षाच्या आब्रुचा प्रश्न निर्माण झाल्याने तसेच पक्षनेते शरद पवार यांनी तुला लढायचं आहे, असे म्हटल्यावर आपण निवडणूकीला उभे राहिलो. यावेळी अशाच पध्दतीने लोकांनी उत्साहात स्वागत केले, त्यावेळी लोकांनी माझ्या पाठीशी निस्वार्थीपणे खंबीर उभे राहून साथ दिली व आपल्यावर केलेले प्रेम हे माझे नशीब समजतो, वय वाढले तसे आज तिसर्या पिढीबरोबरही त्याच उत्साहात काम करत आहे, तुटलेल्या ओंडक्याला पालवी फुटावी त्याप्रमाणे नेहमी तरुणांचे खंबीर पाठबळ मिळत आहे, तुकोबा ज्ञानोबांच्या पालखीप्रमाणे आपला देह पालखी सारखा चालू दे, व अनंतातील पांडूरंग आपल्याला पाहू दे असे बोलत राहिलेल्या दिड वर्षात तालुक्यातील विविध कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने जास्तीतजास्त कामे पूर्ण केली जातील असे म्हटले. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सभागृहे हे मंदिरापुढे बाधून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, खंडेश्वरासमोरील पहिले बहुउद्देशीय सभागृह बांधल्यावर कै. विलासराव देशमुख यांनीही कौतुक करुन आपल्या गावी सभागृह बांधले त्यानंतर अनेक सभागृहे बांधण्यात आली. या निमित्ताने परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे.
आतापर्यंतच्या ५ वेळा विधानसभेवर विजय मिळवतांना योगायोगाने ५ वेगवेगळी चिन्हे ङ्किळाली यात चरखा, सायकल, हात, घड्याळ व कपबशी तर चौथ्या वेळी मिळालेले घड्याळ हे चिन्ह पुन्हा मिळाल्यावर पराभव पत्करावा लागला यावरुन आपल्याला वेगवेगळ्या चिन्हावरच विजयाची खात्री निश्चित असल्याचे सांगत यावेळी पुन्हा एकदा अपक्षाच्या वेगळ्याच चिन्हावर उमेदवारी असल्याचे संकेत दिले. जनतेने आपल्या गुण दोषांसह स्विकार करुन काही दोषांवर पांघरुन घालून जात, धर्म, पक्ष, पंथ यांच्या पलीकडे जाऊन प्रेम दिले, लोकांनी दिलेल्या प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी माझ्या कातड्याचे जोडे केले तरी फिटणार नाही तसेच त्यांच्याशी कधीही कृतघ्न होणार नाही, असेही त्यांनी शेवटी सांगीतले.
यावेळी नागेश अक्कलकोटे, अब्बासभाई शेख, सुधीर सोपल यांनी मनोगते व्यक्त केली. तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.