उस्मानाबाद -: पावसाची अनियमिता लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये ठिबक सिंचनांद्वारे शेती करण्याचे आवाहन खासदार पद्मसिंह पाटील यांनी केले.
येथील डी.पी.डी.सी.हॉल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन व जि.प.स्तरावरील कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता कोरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती पंडीत जोकार, अर्थ व बांधकाम सभापती धनंजय सावंत, प्रेमलता लोखंडे , भोगील जि.प. सदस्य काशीनाथ बंडगर, दीपक जवळगे, मधुकर मोटे, श्रीमती सुशीला कटारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प.कृषि विकास अधिकारी एम.एस.मिणीयार यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होती.
खा.पाटील म्हणाले की, शेतक-यांच्या उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत. विविध धान्य व इतर बि-बियाणांच्या संकरित जातींवर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन केंद्र असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ होण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी संदेश पाठवून जनजागृती करावी. हवामान खात्याच्या वेधशाळेतील अंदाजाची अचूक माहिती शेतकऱ्यांना द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. व्हट्टे यावेळी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शेतीतील उत्पन्नात वाढ झाली की, शेतक-यांच्या आर्थीक उत्पन्नात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना शेती करण्याची आवड निर्माण होण्यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापन केली. त्याआधारेच ग्रामीण भागाचा विकास होत आहे. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती आणली. त्यामुळे शेतीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. राष्ट्रीय उत्पन्नात सर्वात मोठा वाटा शेतीचा आहे. त्यामुळे मजूरांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळेच शेतीवर निष्ठा असणाराच शेतकरी यशस्वी होऊ शकतो,असे त्यांनी सांगितले.
गोरे यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.त्यासाठी पाणी व जमिनीची तपासणी प्रक्रिया सतत चालणारी आहे. पडणाऱ्या पावसाची उपलब्ध पाहून शेती करावी. दुष्काळामुळे पीक परिस्थिती बदलली आहे. भावी काळात शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्यासाठी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदस्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी 2011-12 चा पुरस्कार अशोक नाथनाथ चौपाटे मु.पो.सुर्डी ता.जि.उस्मानाबाद,विलास बाबुराव झिंगाडे मु.पो.लोहारा जि.उस्मानाबाद, रमेश दत्तोबा टेकाळे मु.पो. पाडोळी ता. कळंब, सौ.प्रियंका प्रशांतराव चेडे मु.पो.वाशी, सचिन आगतराव इतापे (माळी) मु.पो.आसू ता. परंडा आणि सतिष गोविंदराव सोमवंशी मु.पो.मळगीवाडी ता.उमरगा यांना देण्यात आला तर सन 2012-13 कृषीनिष्ठ पुरस्कार रामेश्वर हरिश्चंद्र पाटील मु.पो.किणी ता.जि. उस्मानाबाद, सतिष आदिनाथ तवले मु.पो.शेलगांव (ज), ता. कळंब, शहाजी बळीराम कागदे मु.पो.वाशी, तात्यासाहेब तुळशीराम गोरे मु.पो.अंतरगाव ता.भूम, मोहन भुजंगराव करपूरे मु.पो. डोणजा ता. परंडा, नरेंद्र धनराज माने मु.पो.माडज ता.उमरगा, उमांकात प्रभाकर जाधव मु.पो.खेड ता. लोहारा आणि अर्जून मारुती देवकर मु.पो.वाणेगाव ता.तुळजापूर या कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना सहपत्नीक मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ,फेटा व सन्मानचिन्ह व साडी देऊन गौरवविण्यात आले.
यावेळी जि.प.चे शाखा अभियंता डी.एन.सुर्यवंशी व शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी तात्यासाहेब गोरे यांनी आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ए.एस.मिणीयार तर सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी केले. आभार शंकर तोटावार यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पदाधिकारी आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते