उस्मानाबाद :- राष्ट्रीय पिक विमा योजना खरीप हंगाम-2013 साठी पिक विम्याचा हप्ता करण्याची दि. 31 जुलै ही अंतीम तारीख आहे. त्यापूर्वी पिक विम्याचा हप्ता भरणे आवश्यक आहे. ही योजना सर्व पिकासाठी एैच्छिक असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱयांनी विम्याचा हप्ता चलनाव्दारे बँकेत भरणे आवश्यक आहे.
      चालू हंगामात पिक कर्ज वितरण हे राष्ट्रीयकृत बँकांकडून होत असल्याने पिक विमा हप्ता राष्ट्रीय बँकेत भरुन पिकाचा विमा उतरावयाचा आहे. शेतात पिक पेरल्याबददल तलाठयाचा पिक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या  उताऱ्यासह नजिकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेअंतर्गत अति अल्प व अल्पभूधारकांना विमा हप्त्याच्या 10 टक्के सुट देण्यात आली असून त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या 10 टक्के प्रमाणे भरणा करावयाचा आहे. विहीत मुदतीत पिक विमा हप्ता भरण्याचे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
 
Top