उस्मानाबाद -: उत्तराखंड येथे चारधाम यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंपैकी केदारनाथ येथे एका बालिकेला वाचविण्यास यश आले आहे. मात्र त्या बालिकेच्या पालकांचा पत्ता अथवा संपर्क होवू शकलेला नाही. सध्या ही बालिका डेहराडुन येथील डून हॉस्पीटल येथे उपचार घेत आहे. तिच्या पालकांनी अथवा नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन डेहराडून प्रशासनाने केले आहे.