उस्मानाबाद :- युवकांच्या विकासासाठी राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 35 वयोगटातील युवक-यवुतींना व स्वयंसेवी संस्थांना केंद्र शासनामार्फत स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी आपले अर्ज विहीत नमुन्यात 25 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. या पुरस्कारांची अधिक माहिती व अर्ज www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी कळविले आहे.