उस्मानाबाद :- युवक व क्रीडा सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मानाबादच्यावतीने यावर्षी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून तालुकानिहाय सभेचे पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस क्रीडा शिक्षकांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन संजीव कुलकर्णी जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
दि. 15 जुलै रोजी पंचायत समिती कळंब येथे दुपारी 12-30 वाजता तर पंचायत समिती, परंडा येथे त्याचदिवशी दु 12-30 वा. दि. 16 रोजी दुपारी 12-30 वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वाशी आणि श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद. दि. 17 रोजी दुपारी 12-30 वा. पंचायत समिती, भूम आणि पंचायत समिती, उमरगा. दि. 18 रोजी दुपारी 12-30 वा. पंचायत समिती, लोहारा येथे आणि तुळजापूर तालुका क्रीडा संकुल, तुळजापूर येथे सकाळी 11 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.