पंढरपूर -: आषाढी वारीसाठी श्री विठ्ठल मंदिर गुरुवारपासून २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांत तथा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.
    जास्तीत जास्त लोकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता यावे, यासाठी नित्यपूजेच्या शिवाय यजमान पूजा आणि इतर राजोपचार बंद असतात. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेमध्ये लाखो वारक-यांची गर्दी होत असते.
    यात्रेसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठूरायाचे दर्शन व्हावे यासाठीच मंदिर अहोरात्र खुले ठेवले जाते.
 
Top