सोलापूर : जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचा-यांच्या अडीअडचणीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. गेडाम यांनी 2005 पूर्वीच्या उमेदवारांच्या अनुकंपा भरतीबाबत आढावा घेवून संबंधित अधिका-यांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच 2005 नंतरच्या मागील रिक्त पदांच्या 5 टक्के पदे भरता येतात याबाबत मागासवर्गीय कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या भावना शासनापर्यंत कळविल्या जातील असे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी विविध विभागांचा अनुशेष भरण्याबाबतची माहिती घेतली. अनुशेष भरला असल्यास त्याबाबत ज्या कर्मचारी संघटनांनी मागणी केली असल्यास त्यांनाही कळविण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे सहकार विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरती मार्गदर्शन सूचनाप्रमाणे होती की नाही हे पाहावे. रिक्त पदे भरणे आवश्यक असल्यास सहकार विभागाने मंजूरी द्यावी. अशा सूचना दिल्या. भरतीबरोबरच पदोन्नतीने आरक्षणाची पदे भरण्याबाबत संबंधित विभागाचा डॉ. गेडाम यांनी आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या त्याचे निराकरणही डॉ.गेडाम यांनी केले.