उस्मानाबाद :- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातर्गत कंळब तालुक्यातील समाविष्ट गावासाठी मंजूर पेयजल पाणी पुरवठा योजना तात्काळ पुर्ण करा अशा सुचना राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आढावा बैठकीत संबधित यंत्रणेच्या अधिका-यांना सुचना दिल्या.
    या प्रसंगी जि.प.अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, नगरध्यक्ष शिवाजीराव कापसे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुर्यकांत हजारे, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर आदि उपथित होते या प्रसंगी बोलतांना चव्हाण म्हणाले की कळंब तालुक्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातर्गत प्रगतीपथावर असणारे 34 व नव्याने समाविष्ठ असणारे 15  गावाकरिता लोक प्रतिनिधीने  पुढाकार घेवून ही कामे पुर्ण करावीत तसेच या बरोबरच हगंदारी मुक्त गावे,  या कामाकडे ही लक्ष दयावे.  या तालुक्यातील ज्या मंजूर विहीरीची कामे पुर्ण झाली आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा तात्काळ अदा करावा असे संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. घरकुल योजना, विद्युत पुरवठा, आदी जनतेच्या हिताची कामे पुर्ण करावीत. 50 टक्के आणेवारी मध्ये मंजूर असणा-या गावातील लाभार्थ्यांनी त्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडावीत असे सांगितले.
        जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्हट्टे म्हणाले की जी गावे हगंणदारी मुक्त आहेत. अशा गावाना विविध योजनांचा लाभ घेता येतो त्यामुळे गावाचा विकास होऊन त्या गावाचा नावलौकीक  होतो. यासाठी लोक प्रबोधन  होणे गरजेचे आहे. या बरोबर वृक्षलागवड करणे देखील  महत्वाची आहे. म्हणून प्रत्येकांनी एकतरी झाड लावावे असेही त्यांनी सांगीतले. आ.ओमराजे निंबाळकर म्हणाले की,  राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम या तालुक्यात राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गावे हंगणदारी मुक्त करण्यास प्रधान्य  देवू असे सांगितले  या प्रसंगी तहसिलदार डी. एस. शिंदे गट विकास अधिकारी पी. जी. माने, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, सभापती छाया वाघमारे , उपसभापती लक्ष्मण आडसूळ, जनताबँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, नितीन बागल यांच्यासह लोक प्रतिनिधी संबधीत यंत्रणेचे अधिकारी विविध गावचे सरपंच ग्रामसेवक उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्र संचलन अविनाश पवार यांनी केले.
 
कळंब येथील पाणीपुरवठा योजनेचे चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन 
उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते कळंब शहरास पाणीपुरवठा टाकीचे उदघाटन 13 जुलै,2013  रोजी संपन्न झाले.
        या पाणीपुरवठा योजनेचा लाभ कळंब शहरातील 10 हजार नागरिकांना होणार आहे. या बरोबरच शहरातील इंदीरा नगर विभागातील सभागृह तसेच शहरातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण आदि कामांचा शुभारंभ पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी जि. प. अध्यक्ष सुभाष व्हट्टे, आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, नगरध्यक्ष शिवाजीराव कापसे, न.प.चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नगर अभियंता डी.जे.कवडे, जनताबँकेचे चेरमन ब्रिजलाल मोदाणी, नितीन बागल, समाजकल्याण सभापती दगडू धावारे, पं.स.सभापती छाया वाघमारे, उपसभापती लक्ष्मण आडसूळ तहसिलदार डी. एस. शिंदे गट विकास अधिकारी पी. जी. माने, आदि उपथित होते.    
 
Top