पंढरपूर :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखीचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आज शनिवार दि. 13 जुलै रोजी आगमन झाले. याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्‍छतामंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल यांनी माऊलीच्या पादुकावर पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी पुष्‍पहार अर्पण केला.यावेळी आ.हनुमंत डोळस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक राजेश प्रधान,  डॉ.धवलसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री सोपल यांनी माऊलीच्या अश्वाचे पुजन केले.ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम च्या जय घोषात वैष्णवजनांनी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात प्रवेश केला.आता केवळ काही पावलेच सावळा विठ्ठल दुर राहिला आहे.यावेळी  विठूरायाला डोळयात साठविण्याबद्दलचा आनंद प्रत्येक वारक-याच्या चेह-यावरुन ओसांडुन वाहत होता.
      या वारीमध्ये भाविकांना प्रशासनातर्फे सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच पालखी मार्गावरील गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे त्याचबरोबर आगामी काळात महिला वारक-यासांठी स्नान व स्वच्छता गृहे उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचे  पालकमंत्री श्री.सोपल यांनी याप्रसंगी सांगितले.
                     ''  आले कुठुनशी कानीटाळ,
                       मृदुगांची धून,
                       नाद विठ्ठल,                 
                       विठ्ठल उठे रोमा रोमातून''

       अशीच भारावलेली अवस्था घेवून वैष्णवजन पंढरपूरकडे वेगाने वाटचाल करीत आहेत.आज पालखी नातेपुते येथे मुक्कामी येत आहे.
    यावेळी माळशिरचे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, पंचायत समितीच्या सभापती राजलक्ष्मी माने पाटील, तसेच साता-याचे जिल्हाधिकारी एन.रामास्वामी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, ,अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस.प-हाड, जि.प.चे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एस.घुले, अप्पर पोलिस अधिक्षक अमोल तांबे, ‍फलटणचे प्रांतधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार विवेक जाधव,  संपूर्ण स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक शिवाजी माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महावितरण, आरोग्य, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम गाढवे यांनी केले.
                                                                                                                                                 क्षणचित्रे
* सकाळी 11.30 वाजता माऊलीच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन.
* पालकमंत्री सोपल यांच्या हस्ते माऊलीच्या अश्वाचे पुजन, पालखी   
    सोबत ते काहीं काळ चालले.
*  सोपल यांच्या हस्ते दिडीं सोहळा प्रमुखांना मानाचा फेटा बांधण्यात       
      आला.
     * जेष्ठ स्त्री भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या कला पथकाकडून तसेच
        22 जिल्ह्यातील 110 कलावंताव्दारे स्वच्छता व पर्यावरण विषयक
        प्रबोधनपर कार्यक्रम सादर.
     * पुणे, औरंगाबाद, कोल्हापुर, सोलापूर आणि सोलापूर विद्यापिठातील
        विद्यार्थ्यांतर्फे  स्त्री भ्रूण हत्त्येवर विशेष पथनाट्य सादर करण्यात
        आली.
    * संत गाडगे महाराजांच्या हुबेहुब वेशभुषेत औरगांबादचे खंडोजी
        गायकवाड यांच्या कडून स्वच्छता विषयक प्रबोधन
      * वारक-यांची शिस्त वाखण्याजोगी
 
Top