बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: फियाट कार व गॅस किट असलेली मारुती ओमिनी यांच्यात समोरोसमोर धडक होवून झालेल्या अपघातात सिलेंडरचा स्फोट होवून चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बार्शी-परंडा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. या अपघाताची नोंद पांगरी पोलिसांत करण्यात आली आहे.
शत्रुघ्न सुतार (वय 50), गंगुबाई सुतार (वय 45), बालाजी केरबा मोहिते (वय 28), चार महिन्याची मुलगी (सर्व रा. पिंपरी सा.) असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत. चालक सत्यवान मुरलीधर टेकाळे, सुरेश हरिशचंद कात्रेला (सिमेंट व्यापारी) रा. परंडा, जयश्री जनार्दन मोरे (रा. कोर्टी) असे जखमींचे नावे आहेत. यातील फियाट कार क्रमांक एम.एच. 25 आर 1975 व गॅस किट असलेली मारुती ओमिनी क्रमांक एम.एच. 13 ए.एम. 2519 या वाहनांची बार्शी-परंडा रोडवरील उपळाई ठोंगे येथील पाण्याच्या टाकीजवळ समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. त्यात सिलेंडरचा स्फोट होवून कार जळून भस्मात झाली. स्फोटानंतर अपघातग्रस्तांचा काही क्षणातच कोळसा झाला. घटनास्थळी केवळ कवठयाच शिल्लक असल्याचे दिसून आले.
सदरच्या प्रकारानंतर मागील वर्षानुवर्षे बेकायदा गॅसकिटवरील चालणा-या तिनचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रश्न आणि त्याच्या अपघाताची तीव्रता समोर आली आहे. पोलिस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, स्थानिक राजकीय नेत्यांचे पोलिसांवरील प्रचंड दडपण यामुळे सदरचे प्रकार राजरोसपणे सुरु आहेत. अशा प्रकारचे बेकायदा कामकाज करणारांना गॅसची उपलब्धता देखील अगदी सहजासहजी होत आहे. सर्वसामान्य घरगुती गॅसचा अनेक वेळा यामध्ये स्थलांतरीत करण्याचे प्रयोग होत असून अनेक बोगस कार्डची संख्या वापरुन आजपर्यंत शासनाला चुना लावण्याचे कामच गॅस एजन्सीधारकांकडून केले आहे. सध्याच्या के.वाय.सी. बंधनकारकतेमुळे सदरचे प्रकार उघडे पडले असून हजारो बनावट कार्डधारक हे केवळ एजन्सीधारकांनी मुददामहून बनवून घेतले होते व सदरच्या काळया धंदयांना तहसिलच्या पुरवठा शाखेकडूनही हिरवा कंदील मिळत होता. अशा प्रकारचे कामकाज कायदयात बसवयाचे कसे याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून सातत्याने केले जात होते. पोलिसांकडून सदरच्या गॅस वापर करणा-यांवर कारवाई केल्यास त्यांना वेगळया मार्गाने मानसिक त्रास देण्यात येतो व कित्येक दिवस त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जात नाही.