मुंबई -: आयकर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांनी सोमवारी संयुक्त कारवाई करुन गुजरातला जाणा-या चार ट्रकमधून कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. हे ट्रक अंगाडियांचे (सराफा व्यायसायिकांच्या मालाची वाहतूक करणारे) असून ते गुजरातला जाणार होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या ट्रक्समध्ये पैशांनी भरलेल्या 150 बॅग्स आढळून आल्या. याशिवाय सोने, हिरे तसेच मौल्यवान दागिनेही आढळले आहेत. हा सर्व माल जप्त करण्यात आला असून चौकशी सुरु झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रकमधील माल गुजरात मेलमधून गुजरातमध्ये हवालाच्या माध्यमातून पाठवला जाणार होता. परंतु, वेळीच धाड टाकून संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत 50 जणांना अटकही करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या सिंधिया हाऊस या कार्यालयात संपूर्ण माल मोजण्याचे काम सुरु आहे.
प्राप्तीकर खात्याचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, या छाप्यात अनेक मोठ्या बॅग्स सापडल्या आहेत. प्राप्तीकर खात्याचे 50 अधिकारी या कारवाईत गुंतलेले आहेत. नोटांची मोजणी करण्यासाठी आम्ही बँक अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे. तर हिरे आणि दागिन्यांची पडताळणी तसेच किंमत ठरवण्यासाठी नोंदणीकृत जवाहि-यांना बोलावण्यात आले आहे. या कारवाईत ज्या सराफांचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांनी खातेपुस्तकांमधील नोंदी आम्हाला दाखवल्या आहेत. या नोंदी योग्य आढळल्यास आम्ही दागिने जप्त करणार नाही. रोख रकमेचीही नोंद योग्य असल्यास हरकत नाही. परंतु, एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे पैसे पाठवण्याची ही पद्धत कायदेशीर नाही. त्यामुळे त्यावर कारवाई होईल, असे स्वतंत्रकुमार यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत अंगडिया?
अंगडिया म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत हिरे किंवा दागिन्यांची वाहतूक करणारा अतिशय विश्वासू असा कुरिअर बॉय. खासगी कुरिअर किंवा पोस्टाच्या यंत्रणेवर विश्वास नसणा-यांनी ही व्यवस्था निर्माण केली. अत्यंत जोखमीच्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी या व्यवस्थेचा वापर होतो. हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या व्यापाराचा अंगडिया हे प्रमुख अंग आहेत. अंगडियांच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार अंगडिया फक्त सोने, सोन्याचे दागिने आणि हिरे यांची वाहतूक करतात. ते कधीही रोख रकमेची वाहतूक करत नाहीत. तसेच त्यांच्याकडे वाहतुकीसाठी सोपवलेल्या पाकिटात किंवा बॅगमध्ये नेमके काय आहे, याची त्यांनाही माहिती नसते.
या दाव्यानुसार, अंगडियामार्फत सहसा पैशांची वाहतूक केली जात नाही. पण यावेळी अंगडियाकडे मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे. त्यामुळे या रकमेबाबत सर्व व्यवहार तपासण्यात येतील. ही रक्कम बेहिशेबी असल्यास जप्त करण्यात येईल. या मोहीमेत पकडलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी काही अंगडियांनी प्राप्तीकर खात्याच्या अधिका-यांनी सांगितले.

* सौजन्य : दिव्यमराठी