उस्मानाबाद :- शासनातर्फे ग्रामीण भागातील स्वयंरोजगारात वाढ व्हावी व कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करता येण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयात नाविण्यपुर्ण योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, उस्मानाबाद यांनी दिली.
      या योजनेअंतर्गत पक्षीगृह, स्टोअर रुम, पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण, उपकरणे, खाद्याची / पाण्याची /भांडी आदि बाबीसाठी 2 लाख 25 हजार एका गटास खर्च करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवडीचे निकष शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमानुसर करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अत्यल्प भुधारक  शेतकरी  (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरी), अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक असावा), सुशिक्षित बेरोजगार  (रोजगार व स्वयंरोगजार केंद्रात नाव नोंदणी केलेली असावी), महिला बचत गटातील लाभार्थी  ( 1 ते 3 मधील लाभार्थी असावी ). या योजनेसाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत 20 लाभार्थ्यांची निवड करुन 50 टक्के अनुदान व अनु. जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
         विशेष घटक योजनेखाली 12 0 लाभार्थी निवडीचे उददीष्ठ देण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी  कुक्कुट पालन व्यवसायासाठी आपले अर्ज 20 जुलै पर्यंत पाठवावा. अर्जाचा नमुना पशु विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.        
 
Top