उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व केंद्र, राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या खाजगी आस्थपनेत 10 किंवा अधिक मनुष्यबळ आहे, अशा आस्थापनांनी 30 जुन अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) 30 जुलैपर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक आर. एस. पवार यांनी कळविले आहे.
सेवा योजन कार्यालय (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) अधिनियम 1959 कलम 7 (2) अन्वये विवरणपत्र न पाठविणाऱ्या आस्थापनाविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची तरतुद असून अशा आस्थापनांची नावे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन शासनास कळविण्यात येणार आहे.
रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या http::// maharojgar.gov.in या संकेत स्थळावरही विवरणपत्र ऑनलाईन पाठविण्याची सुविधा उपलब्ध असून यासाठी युजर आयडी व पासवर्ड संबंधितांना यापुर्वीच कळविण्यात आले आहे. तरी संबंधित आस्थापनांनी 30 जुन अखेरचे त्रेमासिक विवरणपत्र ई आर- 1 त्वरीत रोजगार व स्वयंरोजगार मार्गर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद कार्यालयात पाठवावेत.