उस्मानाबाद :- सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांच्या निवृत्तीनिमित्त मंगळवारी महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत, फुलारी यांच्या समवेतच्या आठवणीना दिलेला उजाळा, त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे व्यक्त केलेली कृतज्ञता यामुळे हा कार्यक्रम वैशिष्टयपूर्ण ठरला.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी फुलारी यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देवून सत्कार केला आणि परिमल मंगल कार्यालयाचे सभागृह टाळयांच्या कडकडाटात अक्षरक्ष: हरवून गेले. त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या महसूल अधिकारी-कर्मचा-यांचाही यावेळी कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी राम मिराशे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उस्मानाबाद व भूमचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, शोभा ठाकूर, उपजिल्हाधिकारी बी. एस. चाकूरकर, शोभा जाधव, व्ही. एम. कोळी, चंद्रकांत सूर्यंवशी, के. ए. तडवी, मिनाज मुल्ला, श्री. बारवकर, संतोष राऊत, व्ही. एल. कोळी, विविध तालुक्यांचे तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फुलारी यांचा महसूल कायद्यांचा अभ्यास, काम करण्याची पध्दत, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठीची तळमळ, त्यांनी केलेले मार्गदर्शन याविषयी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त् केले. जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनीही आपल्या मनोगतात हीच बाजू मांडली. अत्यंत अभ्यासू, नियमांचा प्रचंड अभ्यास असणारे आणि कठीण परिस्थितीत संयमाने निर्णय घेणारे अधिकारी अशा शब्दांत त्यांनी फुलारी यांचा गौरव केला. सोवानिवृत्तीनंतरची त्यांची सेकंड इनिंग अतिशय चांगली जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी फुलारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नवोदितांना त्यांचे मोलाचे सल्ले, मार्गदर्शन नेहमीच मार्गदर्शक ठरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. उपजिल्हाधिकारी जाधव यांनी त्यांच्या अनुभवाचे सार्थ वर्णन करताना कवीवर्य वसंत बापट यांची बाभुळझाड ही कविता आठवली तर उपजिल्हाधिकारी चाकूरकर यांनी महसूल, पुरवठा आणि भूसंपादन अशा विषयांचा गाढा अभ्यास असणारा अधिकारी या शब्दात त्यांचे वर्णन केले. याशिवाय जीवन कुलकर्णी, जे.टी. अकोसकर, ए. व्ही. कदम, सी. व्ही. शिंदे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
फुलारी यांनी या प्रेमपूर्वक केल्या जात असलेल्या सत्काराचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. कामाकडे सकारात्मक पद्धतीने पाहायची सवय आणि उस्मानाबादकर नागरिकांनी केलेले सहकार्य याची आपल्याला नेहमीच आठवण राहील, असे त्यांनी सांगितले. महसूल अधिकारी-कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, तलाठी, कोतवाल, लिपूक वर्गीय कर्मचारी तसेच इतर विभागांच्या वतीनेही श्री. फुलारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सेवानिवृत्तीबद्दल एन. एम. मुंडे, एस.डी. गोते, एस.एच. महामुनी, के.डी. जाधव, एस.एम. आरगुंडे, श्री. कोळी, जे.जी. घाटे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली तेलोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी केले.