बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आगामी लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या पार्श्‍वभूमीवर बार्शीत शिवसेना जिल्हा निरीक्षक गौरीश शानबाग यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उस्‍मानाबाद जिल्‍हाप्रमुख प्रा. रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, दिपक आंधळकर, नागजी नान्नजकर, काका गायकवाड, जयगुरु स्वामी, वैराग विभाग प्रमुख संतोष गणेचारी, महिला विभाग प्रमुख मंगलताई पाटील, शहर प्रमुख मनिषाताई नान्नजकर, विविध शाखाप्रमुख, बुथप्रमुख व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना भाऊसाहेब आंधळकर यांनी उमेदवार कोण आहे त्यापेक्षा धनुष्यबाणाच्या चिन्हाकडे विशेष लक्ष देऊन प्रचार कार्यासाठी कार्यकर्त्यांनी जीव ओतून कामाला लागावे, येणार्‍या लोकसभा आणि विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा भगवा फडकवून आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. आपल्यावर शिवसेनेचा विश्वास असून त्याला कार्यकर्त्यांनी अहोरात्र झटून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करावे. गद्दारांना शिवसेनेत कसलाही थारा नसून यापुढे गद्दारांना धडा शिकविण्यासाठी व गद्दारीचा बदला घेण्यासाठी शिवसेना पक्षाची मोर्चेबांधणी करावी. मागच्या वेळी लोकसभेत विजयी होणारे रविंद्र गायकवाड यांना थोडक्यात निसटत्या पराभवाला साङ्कोरे जावे लागले त्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांना पक्ष कार्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. यासाठी विशेष समितीमार्फत व योग्य ती खबरदारी घेऊन यंत्रणा पुरविली जाईल. मागच्या वेळी कमकुवत वाटणार्‍या बुथच्या बाबत पुन्हा नव्या जोमाने उणीवा दूर करुन यंत्रणा काङ्काला लावली जाईल असे ङ्कत व्यक्त केले.
    पुढील आठ दिवसांत जिल्हा निरीक्षक गौरीश शानबाग यांचा धाराशिव मतदार संघातील जिल्हा परिषदनुसार बुथ यंत्रणेची माहिती घेतली जाईल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदार संघासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Top