उस्‍मानाबाद -: स्‍व. माजी मुख्‍यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्‍या जन्‍म शताब्‍दी महोत्‍सवी वर्षानिमित्‍त राष्‍ट्रीय गोर बंजारा समाज परिवर्तन अभियानाचे समारोप कार्यक्रम मराठवाडयातील परभणी येथे दि. 7 जुलै रोजी देशभरातील बंजारा समाजाच्‍या प्रमुख संत व मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत होणार आहे.
    हरित क्रांतीचे जनक, महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांचे दि. 1 जुलै 2012 ते 1 जुलै 2013 हा वर्ष जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवी वर्षानिमित्‍त विविध संघटनेंच्‍यावतीने ‘स्‍वाभिमानी समाज निर्माण वर्ष’ म्‍हणून संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमाद्वारे समाजात जनजागरण करुन परिवर्तनशील, स्‍वाभिमानी बलशाली बंजारा समाज निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. त्‍याचबरोबर समाजातील ज्‍वलंत प्रश्‍नाविषयी समाज जागृती करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ व वसंतराव नाईक यांची 100 वी जयंती दि. 7 जुलै रोजी परभणी येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्‍यात आला आहे. त्‍याचबरोबर नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्‍याचे जाहीर केले आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी संपूर्ण देशभरातून वेगळ्यावेगळ्या क्षेत्रातील प्रमुख मान्‍यवरांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. तरी जन्‍मशताब्‍दी महोत्‍सवासाठी परभणी येथे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातून हजारोंच्‍या संख्‍येनी विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंजारा बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन नळदुर्ग येथील वसंतराव नाईक आश्रम शाळेचे अध्‍यक्ष वैभव जाधव यांनी केले आहे.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  अन्‍न व औषध प्रशासन मंत्री ना. मनोहरराव नाईक, उदघाटक म्‍हणुन केंद्रिय सामाजिक न्‍याय व अधिकारीता राज्‍यमंत्री ना. पोरीका बलराम नायक, तर  विशेष  अतिथी म्‍हणुन कर्नाटक राज्‍याचे मजुर मंत्री पी.टी. परमेश्‍वर नायक, संत श्री रामराव महाराज, संत श्री शिवचरण महारज व प्रमुख पाहुणे म्‍हणुन सोलापूर महानगरपालिकेच्‍या महापौर सौ. अलका राठोड, माजी मंत्री मखाराम पवार, माजी मंत्री अमरसिंग तिलावत, आंध्रप्रदेश एआयबीएसचे अध्‍यक्ष के. जगन्‍नाथराव, माजी खासदार हरिभाउ राठोड, आमदार प्रदिप नाईक, आमदार संजय राठोड, एआयबीएसचे अध्‍यक्ष चंद्राम चव्‍हाण, आमदार शिवमुर्ती, माजी आ. मनोहर ऐनापुरे,  दिल्‍लीचे  डॉ.  रमेश आर्य, भरतपूर राजस्‍थानचे एम.के. नायक,  पंजाबचे अॅड. इंदरसिंग वालजोत, हरियाणाचे हरिसिंग, मध्‍यप्रदेश एआयबीएसचे अध्‍यक्ष श्रावणसिंग राठोड, एआयबीएसचे कार्याध्‍यक्ष राजु नाईक, महाराष्‍ट्र एआयबीएसचे अध्‍यक्ष डॉ. टी.सी. राठोड, म.ब.स.क. सेवासंस्‍थेचे अध्‍यक्ष बी.के. नाईक, माजी अध्‍यक्ष बळी राठोड, एआयबीएस मुंबईचे शंकर पवार, भ.वि. युथफन्‍टचे अध्‍यक्ष प्रा. मोतिराज राठोड, सोनपेठचे नगराध्‍यक्ष चंद्रकांत राठोड, राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड, बंजारा क्रांती दलाचे अध्‍यक्ष देविदास राठोड, हिरासिंग राठोड, काशिनाथ राठोड, मोहन राठोड, सुभाष राठोड, आश्रम शाळा महासंघाचे अध्‍यक्ष लालसिंग राजपूत, सवाईराम जाधव, परभणीच्‍या तहसिलदार श्रीमती ज्‍योती पवार, लातूरचे माजी जि.व. अध्‍यक्ष मिठ्ठाराम राठोड, दिल्‍लीचे म.प्र.कॉं. कमिटी सदस्‍य व निरीक्षक संजीवकुमार राठोड आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
फोटो : वसंतराव नाईक
 
Top