उस्मानाबाद :- महात्मा गाधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या 18 ते 60 या वयोगटातील जे कामगार वर्ष 2012-13 मध्ये किमान 90 दिवस काम केले आहे. अशा कामगारांनी बांधकाम कामगारांची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात करुन विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, उस्मानाबाद यांनी  केले आहे.
      महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मागील अशा कामारांची नोंदणी  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून नोंदणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, अर्जासोबत नोंदणी शुल्क रुपये 85 भरुन पावती घ्यावी. सोबत निवासी पत्याचा व वयाचा पुरावा, कामगार असल्याचा पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या तीन प्रती सरकारी कामगार अधिकारी समतानगर, गरड इमारत, उस्मानाबाद येथे अर्ज भरुन देवून नाव नोदणी करुन घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.
 
Top