उस्मानाबाद :- जिल्हयात जुलै महिन्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणा-या अन्नधान्याचे परिमाण खालीलप्रमाणे निर्धारीत केले असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ.  के.एम. नागरगोजे  यांनी कळविले आहे.
     शिधापत्रिका धारकांसाठी बीपीएल योजनेअंतर्गत गहू प्रतिकिलो 5 रुपये दराने 20 किलो, तांदुळ 6 रुपये दराने 10 किलो, ज्वारी 3 रुपये 85 या दराने 5 किलो, अंत्योदय योजनेत गहू 2 रुपये दराने 25 किलो, तांदुळ 3 रुपये दराने 10 किलो, ज्वारी 1 रुपये 50 या दराने 5 किलो, अन्नपुर्णा योजनेअंतर्गत गहू/ तांदुळ प्रतिकार्डास 10 किलो मोफत, ए. पी. एल. गहू 7 रुपये 20 पैसे या दराने प्रतिकार्डास 10 किलो, तांदुळ उपलब्धतेनुसार  9  रुपये 60 पैसे दराने प्रतिकार्डास 5 किलो,  साखर, अंत्योदय, बीपीएल  व अन्नपुर्णा योजनेअंतर्गत  प्रति किलो  13 रुपये 50 पैसे या दराने दरडोई 500 ग्राम  निर्धारीत करण्यात आले आहे.
     याशिवाय सवलतीच्या दराने पामतेल ए. पी. एल., बी.पी.एल , अन्नपुर्णा अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांसाठी प्रतिलिटरसाठी  50 रुपये दर निर्धारीत करण्यात आला आहे. त्याचे वाटप उपलब्धतेनुसार होईल.
    दरम्यान जिल्हा प्रशासनाने केरोसीनचे तालुकानिहाय विक्रीचे दर कळविले असून ते प्रतिलिटरसाठी पुढीलप्रमाणे आहेत.
    उस्मानाबाद 15 रुपये 22 पैसे, तुळजापूर 15 रुपये 11, उमरगा 15 रुपये 33 पैसे, लोहारा 15 रुपये 25 पैसे, कळंब 15 रुपये 45 पैसे, परंडा 15 रुपये 41 पैसे, भूम 15 रुपये 42 पैसे आणि वाशी  15 रुपये 43  पैसे.   
 
Top