उस्मानाबाद -: भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची 2012-13 ची वार्षिक लेखा विवरण पत्र, प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या संबंधित आहरण व संवितरण कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहेत. तरी वर्गणीदारांनी आपली विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत. या वार्षिक लेखा विवरणपत्रात जर काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट/डेबिट दर्शविले असेल, तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदारांची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरण पत्रात नमूद केली नसेल तर त्यांचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान महालेखाकार कार्यालयाला द्यावा. म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करुन देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरण पत्रे ऑक्टोबर 2013 पासून इंटरनेटवर वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. सदर वेबसाईटचा पत्ता http:// agmaha.cag.gov.in असा आहे.
 
Top