उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त प्रेरणा ट्रस्ट संचलीत निवासी अपंग प्रशिक्षण केंद्र (कार्यशाळा), औरंगाबाद येथे व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी अपंगाना प्रशिक्षण देण्यात येते.
यात सी. टी. सी अभ्यासक्रमासाठी- 10वी 12वी परीक्षा उत्तीर्ण, टेलरींग ॲन्ड कटींगसाठी-7वी पास, इलेक्ट्रीक वायरमन- 8 वीपास आणि इनफॉरमेशन टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमासाठी 10 वी पास उत्तीर्ण अपंगाना प्रवेश देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मोफत वसतीगृह, भोजन, निवासाची सोय, वैद्यकिय उपचार आदि सुविधा पुरविण्यात येतात.

प्रशिक्षण कालावधीत अपंगांना स्वखर्चासाठी फाईल कव्हर, फाईल पॅड, बॉक्स फाईल, स्क्रिन प्रिंटीग, खुर्ची केनिंग आदि उपक्रम राबवून विद्यावेतन दिले जाते.
इच्छूक अपंगानी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन अधिक्षक, प्रेरणा ट्रस्ट अपंग कार्यशाळा, औरंगाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.