नळदुर्ग -: सध्या पडत असलेल्या पावसामुळे नळदुर्ग येथील बोरी धरण, खंडाळ प्रकल्प तसेच बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्पात मोठयाप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे.
    गेल्या काही दिवसांपासून नळदुर्ग व परिसरात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्व प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नळदुर्ग येथील बोरी धरणामध्ये सध्या आठ फुट इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नळदुर्ग शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 28 फुट इतकी आहे असून धरण भरण्यासाठी अजून मोठा पाऊस होणे गरजेचे आहे. या धरणावरच बरेच अवलंबून आहे. नळदुर्ग शहरासह तुळजापूर व अणदूर शहराही याच धरणातून पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर धरण झाल्यानंतर हजारो एकीर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र सध्या पावसामुळे धरणात ब-यापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर या पावसामुळे खंडाळा प्रकल्प व बाभळगाव येथील पळस निलेगाव प्रकल्प हे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत. खंडाळा प्रकल्पात सध्या 541.50 म्हणजेच 1.4813 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 548.75 दलघमी इतकी आहे. पळस निलेगाव प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा झाला असून हे प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पात गाळ मोठयाप्रमाणात काढला असल्याने यावर्षी या प्रकल्पात मोठया प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. याचा फायदा या परिसरातील शेतक-यांना होणार आहे.
 
Top