मुंबई : शैक्षणिक कामकाजाचा दर्जा सुधारण्यासाठी ई-गर्व्हनन्स संकल्पना सर्वतोपरी उपयुक्त असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ई-गव्हर्नन्स विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेत श्री.अग्रवाल बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु नरेश चंद्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अभय वाघ यांच्यासह इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर ही बदलत्या काळाची गरज असून राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये ई-गव्हर्नन्स व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, ई-गव्हर्नन्स हे प्रभावी आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शुल्क आकारणी, सर्व महाविद्यालयात आणि शैक्षणिक संस्थामध्ये ऑनलाईन वेळापत्रक यासारख्या वेळेची बचत करुन कार्यपध्दतीत सहजता आणणाऱ्या संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविल्या गेल्या पाहिजेत. शिक्षण क्षेत्रासारख्या महत्त्वपूर्ण कार्यप्रणालीत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी शैक्षणिक, प्रशासकीय कामामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार उपयुक्त ठरणारा असून त्यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्र-कुलगुरु नरेश चंद्र यांनी यावेळी सांगितले.
या एक दिवसीय कार्यशाळेत महाराष्ट्र शासनात ई-गव्हर्नन्सचा होत असलेला वापर, माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या महाऑनलाईन सुविधा, शासनाच्या विविध विभागात राबविण्यात येणाऱ्या ई सुविधा यांची माहिती देण्यात आली.