औरंगाबाद :- येत्या निवडणुकीत मला बीड जिल्ह्यातच कोंडून ठेवण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. यासाठी तीन-तीन बैठका घेतल्या जातात, पण मला तमा नाही. माझ्या हातात तलवार आहे. योग्य वेळी मीही वार करेन. अजित आणि शरद पवार दोघेही बीडमध्ये येऊन बसले तरी मला काहीही फरक पडत नाही, अशा शब्दांत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या कपटनीतीचा समाचार घेतला. संत एकनाथ रंगमंदिरात पक्षाच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. मुंडे म्हणाले, राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांत भय निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मला कोंडून ठेवणे त्यांना कसे शक्य आहे? माझ्यात आत्मविश्वास आहे. योग्य वेळी मी पलटवार करेन. कार्यकर्त्यांनी
चिंता करू नये.
हा तर बुद्धिभेद : निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याच्या प्रकरणावर मुंडे यांनी या वेळी ओझरते भाष्य केले. ते भाषण राजकीय नव्हते. मी कोणावर टीकाही केलेली नाही की कोणाचे नाव घेतले नाही. तरीही मी बालीश बोलल्याचे म्हटले जाते. ते भाषण पूर्ण ऐकले तर चित्र स्पष्ट होईल. भाषणातील एका वाक्याचा तो बुद्धिभेद करण्यात आला आहे. त्या पूर्ण भाषणाची सीडी लोकांमध्ये वाटप करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
भारतीय संस्कृतीवर हल्ला
बुद्धगयेवरील हल्ला हा भारतीय संस्कृतीवरील हल्ला असून त्यामागे नरेंद्र मोदी यांचे नाव लावणे हा निव्वळ मूर्खपणा असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.
चिंता करू नये : निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याच्या प्रकरणावर मुंडे यांनी ओझरते भाष्य केले. ते भाषण राजकीय नव्हते. मी कोणावर टीकाही केलेली नाही. तरीही मी बालीश बोलल्याचे म्हटले जाते. ते भाषण पूर्ण ऐकले तर चित्र स्पष्ट होईल. एका वाक्याचा तो बुद्धिभेद करण्यात आला आहे. त्या पूर्ण भाषणाची सीडी लोकांमध्ये वाटप करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
भारतीय संस्कृतीवर हल्ला : बुद्धगयेवरील हल्ला हा भारतीय संस्कृतीवरील हल्ला असून त्यामागे नरेंद्र मोदी यांचे नाव लावणे हा निव्वळ मूर्खपणा असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.

* साभार : दिव्यमराठी