उस्मानाबाद :- जिल्ह्यात सोयबिन ,कापूस या पिकावर कांही ठिकाणी उंट अळी, व तंबाखुवरील पाने खाणारी अळी स्पोडोप्टेरा अळीचा  प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच कापूस पिकावर तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाण उपाय योजना करुन आपल्या शेतपीकांचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
        सोयाबीन पिकावरील उंट अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळीसाठी - 5 टक्के निंबोळी अर्क 25 मिली आणि क्लोरोपायरीफॉस 25 ईसी 20 मिली किंवा प्रोफेनोफॅास 50 ईसी 25 मिली, कापूस पिकावरील तुडतुडे व पांढरी माशीसाठी - ऑसिटामेप्रिड 20 टक्के 4 ग्राम प्रती 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. सदरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी  किटक नाशकाची मात्रा 3 पट करावी. कापूस बियाणास इमीडाक्लोप्रिडची बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्याच कीटकनाशकाची फवारणी करु  नये असे आवाहन  करण्यात आले आहे.
 
Top