उस्मानाबाद :- सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र सादर केले नाही, अशा विद्यार्थ्यांचे आवेदपत्र पूर्वीच्या प्रचलीत पध्दतीने विशेष अतिविलंब 26 ऑगस्टपर्यत शुल्क अंतिम मुदत रुपये 100 प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थीप्रमाणे भरता येईल. तसेच अतिविशेष अतिविलंब शुल्क  भरण्याची अंतिम मुदत रुपये 200 प्रतिदिनी ,प्रति विद्यार्थ्याप्रमाणे विद्यार्थ्यांची  दि. 27 ऑगस्ट ते दि. 10 सप्टेंबरपर्यंत पूर्वीच्या प्रचलीत पध्दतीप्रमाणे मुदतीत आवेदनपत्र स्वीकारण्याबात शिफारस पत्र (परिश्ष्टि अ) वै्द्यकिय प्रमाणपत्र  व आवश्यक परिक्षा शुल्क अतिविलंब शुल्काचे डी. डी. सह आवेदनपत्रे सादर करण्यात यावे, असे लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.
 
Top