मुंबई -: विधानसभा सदस्यांमार्फत विधानपरिषदेवर निवडून गेलेले धनंजय पंडीतराव मुंडे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत दि. 2 सप्टेंबर, 2013 रोजी मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी करण्यात येणार आहे.
    या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहचण्याचा अंतिम दिनांक 28 ऑगस्ट, 2013 असा आहे. या शिफारशी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी दि.27 ऑगस्ट, 2013 पूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील पोटनिवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील, अशा व्यक्तींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतींसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे दि. 23 ऑगस्ट, 2013 पूर्वी पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच दि. 23 ऑगस्ट, 2013 नंतर या कार्यालयास प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top