मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे.
भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णूता, ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे परस्परांच्या धर्माचा, पंथाचा आदर करण्याची भावना आणि आपली सर्वांची एकजूट यापुढेही अशीच कायम ठेवू. हीच एकजूट आपल्या देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणार आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.