मुंबई -: मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमधील आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीच्या दुर्घटनेत नौदलाचे अधिकारी आणि जवान शहीद झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण स्फोटामुळे सिंधुरक्षक पाणबुडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटनाकेवळ नौदलासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी फार मोठा धक्का आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खदायक आहे. कठीणप्रसंगी संपूर्ण राष्ट्र शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.